योग प्रेमाचे @ फ्रायडे व्हॅलेंटाईन – राजू गावकर

आपलं लिखाण, मनातल्या भावना वाचकांपर्यंत पोहोचवणं ही गोष्ट इबुक माध्यमामुळे अनेकांना सहजसाध्य झाली आहे. असंच राजू गावकर या लेखकाचं पहिलंवहिलं पुस्तकं ‘योग प्रेमाचे @ फ्रायडे व्हॅलेंटाईन’ माझ्या वाचण्यात आलं.

या पुस्तकातली कथा सत्यघटनेवर आधारित आहे. नायक राज हा इंजिनिअर असून तो एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत आहे. ‘राजनं लग्न करावं’ म्हणून आईवडील, नातेवाईक, मित्र… सगळेच त्याच्या मागे लागलेले आहेत… पण तो लग्नाला तयार नाही आणि याचं कारण त्याच्या भूतकाळात दडलेलं आहे. इथं कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते.

राज दर शुक्रवारी शिव मंदिरात जात असतो. अशाच एका शुक्रवारी त्याला मंदिरात एक मुलगी दिसते आणि तिला बघताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर दर आठवड्याला ती त्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसत असते… पण मनातल्या भावना तिला सांगायची हिंमत त्याला होत नाही. असेच काही आठवडे जातात…

राज त्याच्या मनातल्या भावना त्या मुलीला सांगतो का, सांगतो तर कशा, नाही तर काय, त्याला त्याचं प्रेम मिळतं का… या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि एक वेगळी प्रेमकथा अनुभवण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक वाचायला हवं.

लेखकाला टेलीसिरीज किंवा वेबसिरीज आवडत असाव्यात असं कथेचा शेवट वाचताना वाटून गेलं कारण आणखी काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता वाचकाला वाटत राहते. कदाचित लेखक वाचकांना सुचवू इच्छित असावा की, यापुढील पुस्तकात ही कथा संपूर्ण होईल. कथेत जरी अधुरेपण जाणावलं तरी वाचकांनी आपली प्रेमकथा तिथे पाहावी असं मला वाटून गेलं.

प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणतात आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण तिच्या गुणावगुणांसह स्वीकारतो… तसंच या कथेला तिच्या गुणावगुणांसह  स्वीकरलं तर ते प्रेमाचं प्रतीक ठरेल… पण वाचकांना कथेत गुंतवून ठेवण्यासाठी लेखकानं त्रुटींकडे लक्ष देणं गरजेचं वाटतं.

पुस्तकाचं मुखपृष्ठ मात्र कथेशी फारकत घेतं.

किंडल अनलिमिटेडवर हे पुस्तक उपलब्ध असून फ्लीप किंवा स्क्रोल पद्धतीनं सहज वाचता येतं.

हा इबुक-परिचय सहयोगीच्या

‘आयाम’ या उपक्रमाचा भाग आहे. इतर इबुक्सच्या परिचयांसाठी आयामच्या फेसबुक पेजला भेट द्या.

Advertisement
This entry was posted in Marathi and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s