नर्मदा परीक्रमेबद्दल कधीतरी आईकडून ऐकले होते. तिने सांगितले होते कि लोकांना खूप काही अध्यात्मिक अनुभव येतात, ती परिक्रमा करणे सोपे नसते वगैरे. मी अंधश्रद्धा ठेवत नाही पण हां ! काही अनुभव हे तुम्हाला कुठल्याही शास्त्राच्या पट्टीवर पडताळून पाहता येत नाहीत. त्यामुळे मी विश्वास ठेवू शकते कि असे काही घडू शकते.
काही दिवसांपूर्वी माझ्या वाचण्यात नर्मदे परीक्रमे वरचे जगन्नाथ कुंटे यांचे ‘ नर्मदे हर हर ‘ हे पुस्तक वाचण्यात आले. जगन्नाथ कुंटे यांनी तीन वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे. हि परिक्रमा करणाऱ्याला व्यक्तीला ‘ परिक्रमावासी’ म्हटले जाते. अमरकंटकला नर्मदेचा उगम होतो तिथून परिक्रमा सुरु करायचा रिवाज आहे मात्र परिक्रमावासी हि परिक्रमा इतर कुठून हि करू शकतो फक्त पूर्ण परिक्रमा करत पुन्हा त्याच ठिकाणी आल्यावर परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमा सुरु करण्यापूर्वी काही पूजा अर्चना करावी लागते. तसेच पूर्ण परिक्रमेत काही नियम पळावे लागतात. चालत किंवा गाडीने हि परिक्रमा पूर्ण करता येते.
पुस्तकाच्या सुवातीलाच त्यांनी या परीक्रमेचे काही नियम सांगितले आहेत. चालत परिक्रमा करत असताना नर्मदा नदी कायम तुमच्या उजव्या बाजूला असायला हवी. परिक्रमावासी परिक्रमा करताना खुर्चीत किंवा कॉटवर बसू नये. लेखक म्हणतो कि हि परिक्रमा करताना माणसाचा अहं गळून पडतो. चालत जाताना जंगलातून जावे लागत असल्याने समान चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सामानाबद्दलची आसक्ती सुद्धा गळून पडते.
त्यांना काही असे अनुभव आले कि जे वाचताना आपली विचारशक्ती कमी पडते. संपूर्ण पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लेखक कुणीकडे हि त्याला आलेल्या दैवी अनुभवाचे भांडवल करत नाही. उलट असे अनुभव त्यांनी अत्यंत कमी शब्दात मांडले आहेत. त्याचबरोबर त्यांना स्व-स्तुती मान्य नाही. लेखकाने नुसतेच परिक्रमेबद्दल लिहिले नाही तर साधुत्वाच्या नावाखाली बुवाबाजीवर ताशेरे ओढले आहेत.
हे पुस्तक वाचताना कुठे हि आपण काही अध्यात्मिक परिक्रमेबद्दल वाचत आहोत असे जाणवत नाही.