एका साधारण स्त्रीची असाधारण कथा. पंजाबमधील एका डॉक्टर कुटुंबात जन्मलेली, लहानपणी दम्याचा आजार, त्यामुळे मैदानी खेळांपासून कोसो दूर. पण आई, वडील, भाऊ, बहिण आणि नवरा या सगळ्यांचा असलेल्या भक्कम पाठींब्यामुळे २०१२ साली नुकतेच लग्न झाल्यानंतर ३० दिवसात दिल्ली ते मुंबई असे १५०० कि.मी.चे अंतर पळाली.
तिला डॉक्टर म्हणाले कि दम्याला लांब ठेवायचा उपाय म्हणजे फुफ्फुसांची ताकद वाढवणे. मग तिने हळू हळू पळायला सुरु केले. सुरवातीला थोडे धावल्यावर तिला दम लागे. पण हळू हळू तिची ताकत वाढू लागली. मग कुणीतरी सांगितले कि एखादा गृप बघ म्हणजे लांब अंतर पळायला सोबत होईल आणि मार्गदर्शन पण मिळेल. मग मॅरेथॉनची तयारी झाली. थोड्याच काळात तिला पळण्याचे व्यसन लागले.
अशातच तिच्या सोबत पळणाऱ्या एकाने तिला विचारले कि तुला दिल्ली ते मुंबई असे १२०० किलोमीटरचे अंतर पळायला आवडेल का? मिलिंद सोमणच्या नेतृत्वाखाली एक गृप पळणार होता. त्यात ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश होता. २ महिला साधारण अर्धे अंतर पळणार होत्या. हे अंतर ३० दिवसात पळून पुरे करायचे होते. पण शेवटच्या क्षणाला कळले कि दुसरी महिला येवू शकणार नाही आणि सुमेधाला हे १२०० किलोमीटर अंतर धावायचे आहे.
या पुस्तकात तिने आलेले चांगले आणि वाईट अनुभव, प्रसिद्धी माध्यमांच्याकडून मिळालेला थंड प्रतिसाद, अयोजाकांचा आडमुठेपणा आणि लांब पल्ल्याच्या धावण्याबद्दल अनभिज्ञ असलेली सपोर्ट टीम याबद्दल अगदी प्रामाणिकपणे लिहिले आहे. पुस्तक वाचताना वेळोवेळी मला सुमेधा वेगळीच जाणवली. कधी हट्टी, कधी जिद्दी तर कधी थोडी जास्तच अभिमानी.. पण तिचे अनुभव वाचून मात्र एक गोष्ट जाणवली कि मनाशी ठरवले तर काहीच अशक्य नसते. सुमेधा महाजन बद्दल अजून काही जाणून घ्यायचे असेल तर इथे वाचा.
हे पुस्तक मराठी आणि इंग्लिश वाचकांसाठी उपलब्ध आहे. इंग्रजीमध्ये या पुस्तकाचे नाव ‘ Miles to Run Before I sleep’ असे आहे.
मराठी पुस्तकासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इंग्लिश पुस्तकासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Pingback: अनंत माझी ध्येयासक्ती – सुमेधा महाजन — My Experience – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही
धन्यवाद