मराठी भाषा किती अनोखी आहे याची अनेक उदाहरणे आहेत. यापैकी एक आज आपण बघु!
मराठीत ‘मारणे’ हे एक क्रियापद म्हणून आपण वापरतो. त्याला स्वतःचा असा एक अर्थ तर आहेच पण त्याच्यासोबत इतर शब्द आले की त्याचा अर्थ कसा बदलतो ते आपण बघू !
मारणे म्हणजे एखाद्याला चोप देणे असा सर्वसाधारण अर्थ आहे. पण त्याच्या वेगवेगळ्या अर्थ-छटा आपण बघु!
शिक्का मारणे, थापा मारणे, धक्का मारणे, बोंब मारणे, फेर फटका मारणे, उडी मारणे, गप्पा मारणे, सूर मारणे, जोर मारणे, बाजी मारणे, माश्या मारणे, हाक मारणे, थोबाडीत मारणे, शाल जोडे मारणे, डोळा मारणे, एखादी गोष्ट फेकून मारणे.
तुम्हाला अजून काही अशी वाक्य माहीत असतील तर आम्हाला पण सांगा!