सय – माझा कलाप्रवास – सई परांजपे

माझ्या एका मैत्रिणीने मला ‘सय’ हे सई परांजपे यांचे पुस्तक भेट दिले. पुस्तक वाचायला सुरु केल्यापासून हातातून खाली न ठेवता वाचावे इतके सुंदर आहे.
मराठीतून साधारणपणे चांगले आत्मचरित्र खूप कमी वेळा वाचायला मिळते. ‘सय’ मध्ये सई परांजपे यांनी त्यांचा प्रवास खूप सुंदर आणि प्रामाणिकपणे मांडला आहे. जिथे त्यांचे काही चुकले ते तिथे त्यांनी त्याचा कबुलीजबाब दिला आहे. आत्मस्तुती न करता एका तिर्हाईताच्या नजरेतून स्वतःकडे बघणे कठीण असते. पण लेखिकेने ते काम उत्तम केले आहे.
पुस्तकाची भाषा एकदम ओघवती आहे. जरी घडलेल्या घटनांचे तारीख, वार आणि वर्ष नसले तरी त्यामुळे वाचनाचा आनंद सूतभरसुद्धा कमी होत नाही.
सदर पुस्तक एकदम सई परांजपेंसारखे रोख ठोक आहे. जे चूक ते चूक आणि जे बरोबर ते बरोबर असे वागताना त्यांनी कधी हि माणुसकी आणि व्यवहार सोडला नाही. हे या पुस्तकातील अनेक उदाहरणावरून स्पष्ट होते.
त्यांची काही नाटके मी लहानपणी बघितली होती. त्यापैकी एक म्हणजे ‘सख्खे शेजारी’. त्याचे शीर्षक गीत आजही मनात घर करून आहे.
मराठीत आत्मस्तुती न करणारी, स्वतःबद्दल वाढवून चढवून न लिहिलेली आत्मचरित्र कमी आहेत पण ती कमी या पुस्तकाने थोडीतरी भरून निघाली.
आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा पुढचा भाग प्रकाशित झाला तर अजून आवडेल.

Advertisement
This entry was posted in 'Book'ed, Marathi and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s