‘लॉकग्रिफिन’ – श्री. वसंत लिमये

अमेरिकेत सायबर सिक्युरिटी क्षेत्रात काम करणाऱ्या धनंजय कानिटकरच्या आयुष्यात असे काय घडते कि त्याला आणि त्याच्या बायकोला रातोरात अचानक घर सोडून भारतात यावे लागते, ते हि नाव बदलून??
नुकतीच श्री. वसंत लिमये यांची ‘लॉकग्रिफिन’ हि कादंबरी वाचनात आली. खूप सुंदर पद्धतीने मांडलेली रहस्यमय कादंबरी आहे हि. कादंबरी ३ पिढ्यांवर आधारित आहे. साधारण ६२ वर्षांच्या कालखंडाचा आढावा या कादंबरीमध्ये घेण्यात आला आहे . वडील, दोन मुलगे आणि नातू हि या कादंबरीमधील महत्वाची पात्रे. त्यातील एक मुलगा धनंजय हा अमेरिकेत सायबर सिक्युरिटीमधील एक नावाजलेले नाव.
या कादंबरीमध्ये काही राजकीय आणि सामाजिक घटनांचा उल्लेख हा सत्याच्या खूपजवळ जाणारा आहे. अमेरिकेत राहणाऱ्या धन्जाय्च्या आयुष्यात असे काही वादळ येते कि त्याचे पूर्ण कुटुंबात एक सुनामी येते. असा नक्की काय घडते आणि कुठल्या त्या राजकीय गोष्टी आहेत ज्यांचे पडसाद या कादंबरीमध्ये उमटलेले आहेत यासाठी हि कादंबरी वाचणे गरजेचे आहे.
कादंबरीमधील घटनांचे, जागेचे आणि माणसांचे वर्णन अत्यंत बारकाव्यांसह केले आहे. वाचताना सर्व घटना डोळ्यासमोर जश्याच्या तश्या उभ्या राहतात जणू काही समोरच घडत आहेत. लेखकाची इंजिनियरिंगची पार्श्वभूमी कदाचित इतके बारकावे आणि सर्वंकष अभ्यासासाठी नक्कीच फायद्याची ठरली आहे.
अगदी शेवटच्या पानापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारी कादंबरी!

This entry was posted in 'Book'ed, Marathi and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a comment