स्त्री पुरुष समानता हा आजचा परवलीचा विषय झाला आहे. मुलींना शिक्षण द्या. त्यांना नोकरी करू द्या. मुलांप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात मुलींनी स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. मुलींनी मुलांच्या बरोबरीने घरची आर्थिक जबाबदारी उचलली. तितक्याच ताकदीने घरा-दाराची जबाबदारी उचलली.
हि झाली नाण्याची एक बाजू. आता दुसरी बाजू पण बघू या आपण.
पण समानता म्हणजे एक बाजू बळकट करणे नव्हे तर दोन्ही बाजू एकाच उंचीवर आणून ठेवणे.
म्हणजेच जस मुलींना घर बाहेरची जबाबदारी उचलायला शिकवले तसेच मुलांना पण घराची जबाबदारी उचलायला शिकवायला नको का?
आश्चर्य वाटले ना?
पण विचार करा मुलींची घर आणि नोकरी करताना किती दमछाक होते. ऑफिसमधले काम तर मुलगा असो कि मुलगी एकसारखेच असते. पण घराचे काम फक्त मुलीचे असते असे का होते? मुलगा सहज म्हणून जातो मला नाही जमत आणि बाजूला होतो. मुलगी तर असे नाही ना म्हणू शकत. असो!
हे चित्र बदलू शकते. आपण जर आपल्या पुढच्या पिढीतील मुलांना (मुलं आणि मुली) थोडा फार घरची जबाबदारी घ्यायला शिकवले तर नक्कीच फरक पडेल. आपण आपल्या मुलांनापण जर मुलींप्रमाणे थोडी जबादारी दिली तर? सुट्टीत थोडे घरकाम करू दिले तर? रोजच्या रोज स्वतःचे ताट स्वतः घेणे, स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवणे, इत्यादी गोष्टी करायची सवय लावू. परंतु या सवयी आधी आपल्याला स्वतःला लावाव्या लागतील. कारण मुलं निराक्षणातूनचं शिकत असतात.
अर्थात हा विचार फार लोकांना रुचेल असे नाही. माझ्या पिढीतील लोकांनासुद्धा हा विचार पचनी पडणे थोडे अवघड आहे. कारण शेवटी पुरुषप्रधान संस्कृती आहे ना!!
पण मग समानतेच्या गोष्टी अश्या एकतर्फी नाही ना होत! बघा विचार करून आणि तुम्हाला पटलं तर मात्र अंमलात आणा.
सुंदरच आहे हा दृष्टीकोन!