१९ वर्षीय मुलगा बनवतो स्वतःची गाडी

आपण कायम वाचतो कि इंजिनिअरींगच्या मुलांनी सूर्याच्या उष्णतेवर चालणारी किंवा विज्ञान शाखेच्या मुलांनी बॅटरीवर चालणारी गाडी बनवली. आपण खुश होतो, कौतुक करतो. अर्थात त्या मुलांकडे ती गाडी बनवण्यासाठी लागणारे कौशल्य असते, त्यांना लागणारी आर्थिक मदत करायला अनेक कंपन्या पुढे येतात, कॉलेज त्यांना लागणारी प्रयोगशाळा आणि सामग्री उपलब्ध करून देते.  

पण आज मी तुम्हाला एका अश्या मुलाची ओळख करून देणार आहे जो वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे, ज्याने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेले नाही. त्याच्याकडे साधनसामग्री नाही किंवा प्रयोगशाळा हि नाही.  तरी सुद्धा एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या प्रेम ठाकूरने स्वतःची एक बग्गी बनवली. हां!! पण हि बग्गी जुन्या काळातल्या बग्गीसारखी घोडे नाही ओढत तर तर हि आहे चक्क पेट्रोलवर चालणारी एक गाडी.

प्रेमचे वडील रिक्षाचालक आहेत. दिवसभर मेहनत करून जेमतेम ५०० ते ७०० रुपयांची मिळकत होते. पण स्वतःच्या मुलाच्या शिक्षणात काहीहि कमी ठेवायची नाही या मनिषेमधून, त्यांनी प्रेमला त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी एक संगणक घेवून दिला.

त्या संगणकाने त्याचे आयुष्यच बदलून टाकले.  त्याने इंटरनेटचा वापर जगाशी ओळख करून घेण्यासाठी करायला सुरवात केली.  ज्या वयात इतर मुलं इंटरनेटवर निरनिराळे खेळ खेळतात, सिनेमा बघतात, किंवा काही वेळा काही अश्लील विडिओ बघता त्या वयात प्रेमला वेड लागले होते ते निरनिराळ्या गाड्यांचे विडिओ बघायचे.

हे विडिओ बघताना, प्रेमने स्वतःची गाडी बनवायचा निश्चय केला. यासाठी त्याने एका जुन्या ह्युंदाई असेंट या गाडीचे इंजिन वापरले. गाडीची चासिस त्याने स्वतः वेल्डिंग मशीन आणून घरीच बनवली. गाडीचे डिझाईन, रंगकामसुद्धा त्याने स्वतः केले. हि गाडी बनवायला त्याला सर्वसाधारणपणे  चार महिने लागले आणि अदमासे अडीच लाख रुपये इतका खर्च आला.  हा खर्च पुरा करायला त्याला त्याच्या आई-वडीलांनी आणि आजीने केली. घरच्यांचा हा भरोसा त्याने सार्थ ठरवला.

आज ज्यावेळी तो हि गाडी जेव्हा रस्त्यावर घेवून जातो किंवा पेट्रोल पंपावर जातो त्यावेळी लोक त्याच्या आजूबाजूला गोळा होतात. त्याचे, गाडीचे फोटो काढतात.  त्याचे स्वप्न आहे हि गाडी घेवून रेसिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्याची आणि ऑटोमोबाईल इंजिनियर बनण्याचे. या गाडी बनवण्याचे सर्व श्रेय तो इंटरनेट आणि घरच्यांना देतो.

आजमितीला youtube या साईट वर अनेक विडिओ उपलब्ध आहेत, जे तुम्हाला खूप गोष्टी स्वतः बनवायला शिकवतात, मग तुम्हाला साधी बुटाची लेस बांधायची असेल, घर सजवायचे असेल किंवा फोटोग्राफी शिकायची असेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सर्व फुकट उपलब्ध आहे.

आज ज्यावेळी कधी कधी मुलांना इंटरनेट देताना पालक विचार करतात तिथे प्रेम ठाकूर सारखी मुलं त्याचा सदुपयोग कसा करावा हे सांगतात. अर्थात यासाठी त्याच्या घरच्यांचे हि तितकेच कौतुक करायला हवे. त्यांनी त्याच्यावर विश्वास तर ठेवलाच पण आर्थिक मदतसुद्धा केली.

या अश्या अवलियाला ‘भारतीयन्स भारतीयान’ चा सलाम !

http://www.huffingtonpost.in/2016/10/18/this-19-year-old-built-his-own-car-by-watching-youtube-videos/

http://www.indiatimes.com/news/india/this-19-year-old-boy-self-learned-how-to-make-a-car-watching-youtube-videos-and-built-his-own-263720.html

 

(published at Bharatiyans on 7 Nov 2016)

Advertisement
This entry was posted in Article. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s